सामाजिक बांधिलकी जपणारा दानशूर पोलीस :नारायण पवार

कुरकुंभ,सुरेश बागल

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी अनाथ मुलांचे अनाथाश्रम बालसदन येथे वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

एखाद्या मोठ्या माणसाचा वाढदिवस म्हटला तर तो मोठ्या थाटामाठात केला जातो परंतू दरवर्षी पोलीस निरीक्षक नारायण पवार आपल्या पोलीस स्टेशनच्या
लहान मुलांचे अनाथाश्रम आहे तिथे वाढदिवस साजरा करतात.लहान मुलांबरोबर वाढदिवस साजरा करताना वेगळाच आनंद मिळत आहे आणि एक प्रकारची वेगळीच ऊर्जा मिळत आहे असे नारायण पवार यांनी सांगितले.

ज्यांच्या साठी कोणी नाही त्यांच्यासाठी आम्ही पोलीस
रक्षण करण्यासाठी असतो असे त्यावेळी बोलत होते.यावेळी दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे , अनाथाश्रम मधील लहान मुले , पोलीस स्टाफ आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

Previous articleभाऊसाहेब महाडिक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने किर्तन सोहळा संपन्न
Next articleगणेश टिळेकर व विकास कोतवाल यांची डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी बिनविरोध निवड