भाऊसाहेब महाडिक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने किर्तन सोहळा संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

आजच्या काळात माणसाला समाधानाची गरज आहे. समजत असून लोकांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन होणे अपेक्षित आहे. कितीही विपरीत परस्थिती आली तरी आपल्या उच्च विचाराने परिस्थितीशी सामाना करता आला पाहिजे. आपल्या मुलांवर संस्कार करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारुन करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. आपल्या वडिलांनी घालून दिलेला आदर्श विचार संस्कार घेऊन दोन्ही भावंडे माजी सरपंच आण्णा महाडिक व माजी गणेश महाडिक सामाजिक जाणीव ठेवून समाजात कार्यरत आहेत याचा आदर्श आजच्या युवकांनी घेण्यासारखा आहे असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

ह.भ.प.स्व.भाऊसाहेब आनंदा महाडिक यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तसेच ह.भ.प.रामराम महाराज ढोक यांचेही कीर्तन संपन्न झाले. दोन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच गणेश महाडिक व माजी सरपंच आण्णा महाडिक सह गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले होते. आण्णा महाडिक युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद अध्यक्ष नवनाथ काकडे, डॉ मणिभाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, माजी संचालक यशवंतचे रघुनाथ चौधरी, सरपंच एल बी कुंजीर, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष सोपान कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र बडेकर, सरपंच विठ्ठल शितोळे, सरपंच सुरज चौधरी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, मयूर कांचन, अर्जुन कांचन, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चित्रपट साहित्य कला सांकृतिक विभागाचे विजय तुपे, जानाई डेव्हलपर्सचे सागर कांचन, राजु भाटे, संदीप गव्हाणे, भुजंग महाडिक, रामभाऊ महाडिक, संजय डोबाळे, सोमनाथ चव्हाण, कांतीलाल चव्हाण, बाबा यादव, विश्वास महाडिक, पूर्व हवेली तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी युवक, गावातील ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleदौंडमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
Next articleसामाजिक बांधिलकी जपणारा दानशूर पोलीस :नारायण पवार