दौंडमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

दिनेश पवार:दौंड

जागतीक दिव्यांग दिना निमिंत स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची शाळा दौड येथील शाळेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले, थोर समाजसेवीका मदर तेरेसा यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,भंडारी सर यांनी.

यावेळी विशेष मार्गदर्शन केले,गणेश हाके,दिगंबर पवार,गिरिष हिप्परगी,सुजाता गायकवाड,कला शिक्षक दिनेश बत्तीसा,अधिक्षक वैभव शेलार,लिपिक विशाल कर्नेवार,परिचारिका मोनिका गायकवाड, काळजीवाहक,विनोद मराठे,विक्रम शेलार,संजय बनसोडे,संतोष भंडारी सह आदी मान्यवार उपस्थित होते.यावेळी दिगंबर पवार यांनी मनोगत व्यक्त केले

अंतरराष्ट्रिय पातळीवर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येत असताना दिव्यांगांना आधार म्हणून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अहोरात्र दिव्यांगांसाठी झटणा-या व्यक्तींचाही दिव्यांग दिनी उल्लेख करावासा वाटतो.अनेक समाजसेवक हे दिव्यांग व्यक्ती साठी काम करत असतात व दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असतात या पैकी दिव्यांगांचे एका हाकेला साद घालणारे असंख्य समाजसेवक काम करत आहेत त्यांचे या दिनी आवर्जून नाव घेतले जाते दिव्यांगांचे जीवनमान बदलुन त्यांना त्यांचे हक्क व आधिकार मिळवुन देण्याचा विडा उचललेले असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत.त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे असे मत दिगंबर पवार यांनी व्यक्त केले,या कार्यक्रमाचे आभार दिनेश बत्तीसा यांनी मानले

Previous articleवानरलिंगी सुळक्यावरून महाराजा यशवंतराव होळकरांना मानाचा मुजरा
Next articleभाऊसाहेब महाडिक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने किर्तन सोहळा संपन्न