पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीकरीता राजेंद्र कांचन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमोलने भोसले,उरुळी कांचन

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सन २०२१ – २०१६ उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर उरुळी कांचन (ता.हवेली) येथील डाॅ.मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांनी उमेदवारी अर्ज ‘क’ दाखल केला.

याप्रसंगी मा.आमदार व पी.डी.सी.सी.बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे व भगवान कांचन उपस्थित होते.

पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम चांगले असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने उरुळी कांचन येथील डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन यांना उमेदवारी भेटली पाहिजे असा विचार पूर्व भागातील अनेक मंडळीचा आहे.

Previous articleउरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता बागडे यांची बिनविरोध निवड
Next articleलसीच्या प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यूच्या प्रमाणपत्रावर पण छापायची जबाबदारी घ्यायला हवी- खा डॉ.अमोल कोल्हे