उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता बागडे यांची बिनविरोध निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता सुभाष बगाडे यांची बिनविरोध करण्यात आली. उपसरपंच संचिता संतोष कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अनिता बगाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कांचन यांनी अनिता बगाडे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी यशवंत डोळस यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

याप्रसंगी जि.प.सदस्या कीर्ती कांचन, सरपंच संतोष कांचन पु.जि.नि.समितीचे सदस्य संतोष कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, मावळत्या उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, राजेंद्र कांचन, भाऊसाहेब कांचन, शंकर बेडकर, प्रियांका कांचन, मयूर कांचन, सुनिल तांबे, मिलिंद जगताप, सिमा कांचन, स्वप्नीशा कांचन, सुजाता खलसे, अनिता तुपे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बडेकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बगाडे, सागर कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आमची कुठलीही राजकीय पार्श्वभूमीवर नसताना माझे पती सुभाष बगाडे हे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात त्यांच्या संघटन कौशल्याने तसेच माझ्या वार्डमधील नागरिकांच्या आशिर्वादाने मला दुसऱ्याद्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी नागरिकांची ऋणी आहे. गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु असे आश्वासन नवनिर्वाचित उपसरपंच अनिता सुुुभाष बगाडे यांनी व्यक्त केले.

Previous articleजुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊसाचा धुमाकूळ ; ७४७ पेक्षा जास्त शेळ्या,मेंढ्या व गायींचा मृत्यू
Next articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीकरीता राजेंद्र कांचन यांचा उमेदवारी अर्ज दाखल