पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा वाढदिवस अविश्री बालसदन मध्ये साजरा

दिनेश पवार,दौंड

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आपला वाढदिवस दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील अविश्री बालसदन येथील अनाथ आश्रम मध्ये साजरा करून युवा पिढीसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे,पोलीस निरीक्षक नारायण पवार ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असतील तेथील अनाथाश्रम मध्ये ते दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करतात.

 

यावर्षी देखील त्यांनी असाच वाढदिवस साजरा केला,सध्या वाढदिवस प्रथा बदलत चालली आहे, आकर्षण,मोठेपणा, भपकेबाजी यामुळे वाढदिवसाचे वळण युवा पिढीत वेगळे पडत चालले आहे, आशा पिढीने या उपक्रमातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.

यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे,पत्रकार प्रफुल्ल भंडारी, वाजीद बागवान,पवन साळवे,विनोद गायकवाड, विलास कांबळे,पोलीस कर्मचारी,अविश्री बालसदन चे कर्मचारी व मुले उपस्थित होते

Previous articleअंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
Next articleकोरेगावमुळचे सुपत्र उद्योजक बापुसाहेब शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन