अंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

अमोल भोसले,पुणे

खोडदच्या ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नारायणगाव बायपास रस्त्यावरील तिसऱ्या फेजमधील खोडद चौक व पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीयमंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.

मागील आठवड्यात खोडद चौकात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नारायणगाव बायपास रस्ता बंद केला होता. या ग्रामस्थांची समजून काढताना खासदार डॉ. कोल्हे यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्याचबरोबर संसदेचे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी श्री. गडकरी यांची भेट घेऊन तिसऱ्या फेजमधील खोडद चौक व पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना मंजुरी देण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या सूचनेनुसार सुरक्षाविषयक उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून आज केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन तिसऱ्या फेजमधील नारायणगाव बायपास रस्त्यावरील खोडद चौक व पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.

केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तिसऱ्या फेजमधील खोडद व पाटेखैरेमळा येथील अंडरपासच्या कामांना मंजुरी मिळण्याची प्रक्रिया लवकर होईल अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. तसेच अधिवेशन काळात याविषयी प्रत्येक टप्प्यावर आपण या कामाचा पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleडिंभा कालव्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान
Next articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा वाढदिवस अविश्री बालसदन मध्ये साजरा