Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अमोल भोसले,उरुळी कांचन
ग्रामीण भागातून चांगले खेळाडू घडले पाहिजे. तरुणांनी भविष्याच्या दुष्टीने निश्चितच धेय्य धोरण ठरवून वाटचाल करावी कारण तरुणांच्या हातात खूप मोठी ताकत आहे आपल्या मध्ये असणारे कलागुण ओळखता आले पाहिजे. तुम्ही कुठलेही श्रेत्र निवडा त्याठिकाणी करिअर करा असे मत पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांनी केले.
कोरेगावमुळचे (ता.हवेली) सुपत्र उद्योजक बापुसाहेब शितोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनाच्या काळात जीवनावश्यक किराणा किटचे मोठ्या प्रमाणात वाटपही केले. वस्तूंचे अनाथ आश्रम याठिकाणी खाऊचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, मुंबई केसरी पै आबासाहेब काळे, कोरेगावमुळ सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश भोसले, माजी सरपंच ताराचंद कोलते, माजी उपसरपंच नारायण शिंदे, भारतीय जनता पार्टीचे हवेली तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष राजेश शिंदे, उद्योजक प्रितम शितोळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मुकिंदा काकडे, उद्योजक बाबासाहेब चौधरी, माजी चेअरमन लोकेश कानकाटे, माजी उपसरपंच विठ्ठल थोरात, युवा नेते यश कोलते, मा.सदस्य निखिल पवार, अष्टविनायक रोज नर्सरी विशाल शितोळे, रामदास काकडे, राजेंद्र भंडारी, सचिन कानकाटे, गणेश कोलते, अजित काकडे, महेंद्र काकडे, कुलदीप काकडे, युवराज कोलते, समाधान अवचट, अमर आतकर आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.