नारायणगाव ते शिर्डी सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग

नारायणगाव : किरण वाजगे

  तरूणांमध्ये आरोग्य व पर्यावरण जनजागृती व्हावी तसेच तरूण पिढी व्यसनापासुन दुर राहावी या हेतूने प्रेरित होऊन नारायणगाव ते शिर्डी सायकलवारीचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

नारायणगाव व परिसरातील उत्कृष्ठ सायकलपटूंना या सायकलवारीत बोलावुन आपल्या ग्रामीण भागातील नवख्या सायकलस्वारांना मार्गदर्शन या वारीच्या निमित्ताने होते.भक्ती शक्तीच्या या संगमातून अनेक जिल्ह्यातील लोक सामील होत असतात. यामध्ये सातारा, सांगली, नाशिक,नगर,राजगुरूनगर,पुणे,मुंबई येथील सायकलिस्ट जमा होऊन शिवजन्मभुमीतुन शिर्डीकडे जातात.

आरोग्यासाठी पोषक ठरणारी ही सायकलींग अनेक जण या सायकरवारीत शिकले आहेत. या सायकलवारीत अनेक नवख्या जणांना बोलावुन ते उत्कृष्ठ सायकलींग करू लागले आहेत.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या या सायकल वारी मध्ये घारगाव येथे सायकलस्वारांसाठी दुपाराच्या साईंच्या आरती नंतर जेवणाची सोय भंटकती ग्रुपच्या वतीने सुदीप कसाबे,अनिलतात्या दिवटे,जयेश कोकणे,प्रसाद दिवटे व मित्रपरिवाराने केली.

सायकलवारी शिवजन्मभुमी फाउंडेशनचे मुख्य संयोजक धनंजय माताडे यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आली. ही सायकल वारी यशस्वी करण्यासाठी सुनील इचके,संकेत वाघ,अभि शेटे,संदेश शिंदे ,ॠतीक गुंजाळ,राजू भोरे,पवन घोलप,धनंजय माताडे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleडॉ. सुमेध सोनवणे यांचा़ सन्मान
Next articleखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दखल घेतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत बोगद्याचे काम पूर्ण