डॉ. सुमेध सोनवणे यांचा़ सन्मान

नारायणगाव: किरण वाजगे

भारती विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील उपक्रमशील व्यक्तीमत्व डॉ. सुमेध सोनवणे यांना “शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता” या पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले.

डॉ सुमेध यांचे शालेय शिक्षण चाळकवाडी येथील शाळेबरोबर नारायणगाव येथील गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिरात झाले. डॉ सोनवणे यांना भारती विद्यापीठ येथे व्याख्याता म्हणून कार्यरत असताना सम्मानित करण्यात आले आहे. सध्या ते नायर रूग्णालय मुंबई सेंट्रल व टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सन्मानाबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, सरपंच प्रदीप चाळक यांनी डॉक्टर सुमेध सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleअज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू
Next articleनारायणगाव ते शिर्डी सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग