आदिवासी विकास (असो.) संघटना युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी गणेश गायकवाड यांची निवड

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पद अधिकारी निवड संस्थापक अध्यक्ष मा,श्री,मोतीलालजी सोनवणे सर यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री,संजयभाऊ कोळी यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय पांडुरंग मोरे कोळी यांच्या हस्ते पुणे येथील श्री गणेश शहाजी गायकवाड रा खानवटे ता दौंड जि पुणे यांची उपाध्यक्षपदी निवड पत्राद्वारे करण्यात आली.

पूर्वीच्या त्यांच्या कार्याची दखल घेत आदिवासी विकास (असो.) संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी – गणेश शहाजी गायकवाड रा खानवटे ता दौंड जि पुणे यांची आदिवासी जमातीच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र आदिवाशी विकास (असो.) संघटना महाराष्ट्र कार्य करीत आहे त्यामध्ये युवा आघाडी कार्यकारिणीमध्ये भर टाकत आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष – प्रा. मोतीलाल सोनवणे सर, उपाध्यक्ष -संजय भाऊ कोळी कार्याध्यक्ष -विजय पा. मोरे सल्लागार – ॲड. गणेश सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमूख- मा.धर्मेंद्र आबा कोळी ,खानदेश विभाग अध्यक्ष भैय्यासाहेब सावळे, मराठवाडा कर्मचारी अध्यक्ष – संभाजी उत्तरवाड ,महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी – सोनालीताई कोळी , महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी कार्याध्यक्ष – अजय नेहतराव असून त्यांच्या निवडी बदल सर्व कोळी जमाती व इतर त्याचे अभिनंदन करत आहेत व या वेळी सर्व आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य चे पद अधिकारी उपस्थित होते

Previous articleकेंद्रीय पत्रकार संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव रणदिवे
Next articleपुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार