केंद्रीय पत्रकार संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव रणदिवे

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

केंद्रीय पत्रकार संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव रणदिवे यांची निवड करण्यात आली,केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष- संदीप वि. कसालकर,राष्ट्रीय महासचिव-मा.जगन्नाथ कामत,राष्ट्रीय उपाध्यक्ष,व महाराष्ट्र प्रभारी- मा.कमलेश गायकवाड,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख-मा.अमित बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील कार्यकारणी काम करणार असल्याचे दौंड तालुकाध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी सांगितले.

तालुक्याच्या अध्यक्ष पदी निवड होताच रणदिवे सरांनी लगेचच तालुका कार्यकारणी करण्यास सुरुवात केली आहे.यामध्ये काही कार्यक्षम पत्रकारांची निवड देखील केलेली आहे,यामध्ये दौंड तालुका संपर्क प्रमुख पदी- लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चे संपादक-मा.विलास जयवंत कांबळे, दौंड तालुका सचिव पदी-महाराष्ट्र भूमी न्यूज चे पत्रकार-मा.विठ्ठल अनंता होले,दौंड तालुका संघटक पदी-मा.शिवकुमार धर्मराज कांबळे यांची निवड नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी केली आहे.
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच पत्रकारांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सदाशिव रणदिवे यांनी सांगितले.

यावेळी साईनाथ शिंदे- अध्यक्ष-माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य, मा.संभाजी दळवी- ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष, मा.संकेत दळवी-बळीराजा शेतकरी संघ दौंड तालुका अध्यक्ष, मा.आदित्य मिसाळ हे उपस्थित होते