“विद्यालयाचे विद्यार्थी ते प्राचार्य असा प्रवास” बबनराव दिवेकर यांची महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा सर्वोदय संघ संचलित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक तांत्रिक किमान कौशल्यासह ग्रामीण विभागात शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असलेल्या विद्यालयाच्या प्राचार्यपदी बबनराव कृष्णाजी दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

विद्यालयाच्या वस्तीगृहाचे विद्यार्थी ते प्राचार्य अशी गुणवत्तापुर्वक प्रवास, शालेय शिस्त गुणसंपन्न विद्यार्थी असे नवनियुक्त प्राचार्य बबनराव दिवेकर यांच्याकडे पाहिले जात आहे. नियुक्तीपत्र व पदभार देण्यासाठी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा.के.डी.कांचन, सचिव सोपान कांचन, खजिनदार – विश्वस्त राजाराम कांचन, संभाजी कांचन, माजी प्राचार्य देविदास टिळेकर , अ.वि.काकडे प्रशासकीय वर्ग, अध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाचे आजी – माजी सर्व विद्यार्थ्यांनकडुन प्राचार्य बबनराव दिवेकर यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना अण्णाभाऊ साठे क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित
Next articleकेंद्रीय पत्रकार संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव रणदिवे