राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना अण्णाभाऊ साठे क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

पुणे येथे झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त पँथर स्पोर्ट्सच्या माध्यमातून उरुळी कांचन (ता.हवेली) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल अण्णाभाऊ साठे क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

उपस्थितांमध्ये पँथर संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे संयोजक क्रीडा संघटक संजय कांबळे सर सर्व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

पुरस्काराने जबाबदारी वाढली असल्याने आई – वडील, गुरुजण, मित्रपरिवार यांनी तसेच क्रीडा क्षेत्रातील असंख्य शिक्षकांनी वेळोवेळी बहुमोल केलेले मार्गदर्शन यामुळे मी काम करु शकलो यापुढेही ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सतत करण्याचा प्रयत्न करणार असे राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.