रायकर दांपत्याचा महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मान

कुरकुंभ : सुरेश बागल

सातारा येथे महात्मा फुले विचार अभियान सन्मान युवा मनाचा गौरव फुले विचारांचा हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष अजित जाधव , सुजन फौंडेशन यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातल्या लोकांचे सत्कार करण्यात आले.

फुले विचारांचा या निमित्ताने दौंड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते व यवत गावातील रहिवासी मंगेश रायकर आणि त्यांच्या पत्नी यांना खंडाळा येथे महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भेटायचे कारण म्हणजे की दोघांचे सामाजिक काम उत्कृष्ठ पद्धतीचे असल्याने मंगेश रायकर आणि त्यांच्या पत्नी यांना अभियान मेडल, महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो, प्रमाणपत्र, व रागिनी विशेषांक २०२१ देऊन गौरविण्यात आले.

दोघांना एकत्रित पुरस्कार मिळाल्याने यवत येथील
आसपास राहणाऱ्या महिलांनी,नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले.

Previous articleसंडे वन” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते
Next articleगावठी कट्ट्यासह सराईत जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई