संडे वन” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा आणि शिखर गाठण्यासाठी नेढ्यातून मार्ग काढावा लागणारा २८० फुटी “संडे वन” सुळका टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहकांनी सर करीत अभिमानाने तिरंगा फडकाविला.

या मोहीमेची सुरवात पेगल वाडी, (ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक ) येथुन झाली. दीड तासांचा खड्या चढाईचा मार्ग सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जातो. अरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते.

पहिला सरळसोट ९० अंशातील ४०फुटी टप्पा पार केल्यावर एक १५ फुट ट्रॅवर्स मारल्यवर येणारा ओव्हरहँगचा टप्पा शारीरिक कसोटी पाहणारा आहे.

पुढचा १५ फुटी सोप्पा टप्पा पार केल्यावर शारीरिक कसं लागणारा ८० फुटी टप्पा पार केल्यावर नेढ्यातून मार्ग काढून अखेरचा ३० फुटी टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील सरळसोट चढाई, ओव्हरहँगचा खडतर मार्ग, निसरड्या पाऊलवाटेच्या शेजारी असणारी खोल दरी, पाण्याची कमतरता असलेला दुर्गम परिसर अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, अर्चना गडधे, ज्ञानो ठाकरे, सर्वेश भावसार, आयुष धंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जय जाधव, समीर देवरे, उमेश कातकडे, महेश जाधव, युग पवार, वैभव गांगुर्डे, बाळू कांडेकर, प्रदीप बारी, सचिन कदम, निलेश तांबे, मोक्षदा कदम, स्वराज ढेमबरे, विशाल बोडके, ज्ञानदा कदम(वय ६ वर्षे) आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleनामदेव भोसले यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
Next articleरायकर दांपत्याचा महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मान