गावठी कट्ट्यासह सराईत जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक सासवड जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सदर पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सासवड दिवे रोड च्या कडेला हॉटेल मयूर येथे एक इसम त्याचे कम्बरेला एक लोखंडी पिस्तुल लावून सदर ठिकाणी फिरत असलेचे सांगितले वरून सदरील माहिती वरून सदर ठिकाणी गेलो असता बातमीदार यांनी सांगितले वर्णना च्या इसमास ताब्यात घेतले असता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कम्बरेला एक लोखंडी बनावटीचे एक गावठी पिस्तुल मिळून आले त्याचे मॅगजीन चेक केले असता त्यामध्ये २ जिवंत काडतुसे मिळून आली , सदर इसमास त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अंबाजी कल्याणी शिंगे वय २१ वर्षे रा नवीन म्हाडा कॉलनी बिल्डिंग नं ३९ ससाणे नगर हडपसर पुणे असे सांगितले सदरील इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडील खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गावठी लोंखडी पिस्तुल कीं रु: ३५,००० , जिवंत काडतुसे :२ रु २०० असा एकूण ३५,२०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वरील इसम नामे अंबाजी कल्याणी शिंगे वय २१ वर्षे रा नवीन म्हाडा कॉलनी बिल्डिंग नं ३९ ससाणे नगर हडपसर पुणे याचे वर सासवड पोलिस स्टेशन येथे भा ह का कलम ३, (२५) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास कमी सासवड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. सदरील आरोपी हा रेकॉर्ड वरील सराईत आरोपी असून त्यावर खालिल गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

वानवडी पोलिस स्टेशन गु र नं ८८१/२०२० भा द वी ३८७, ५०४,५०६,३४.. मुंढवा पोलिस स्टेशन गु र नं ४८४/२०२० भा ह का कलम ३, (२५) नुसार गुन्हे दाखल आहेत.

सदरील कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय अधिकारी भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अजय घुले, पो हवा विजय कांचन, पो हवा अभिजित एकशिंगे, पो ना स्वप्निल अहिवळे, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.

Previous articleरायकर दांपत्याचा महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मान
Next articleमहावितरणचे अधिकारी व शेतकऱ्यांची एकत्रित बैठक