बकोरीच्या डोंगरावर निसर्ग सेवा करणाऱ्या ‘मोती’ श्वानाला देण्यात आला अखेरचा निरोप

गणेश सातव,वाघोली

बकोरी येथील वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांच्या कुटुंबात वाढलेल्या व बकोरीच्या डोंगरावर वृक्षमित्रांच्या बरोबरीने निसर्ग सेवा करणाऱ्या ‘मोती’ श्वानाचे नुकतेचं किरकोळ आजाराने आकस्मित निधन झाले.

मोतीला अखेरचा निरोप देण्यासाठी वारघडे यांच्या कुटुंब व मित्र परिवाराच्यावतीने बकोरी येथील वनराई-देवराई प्रकल्पात शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक मान्यवरांनी मोतीला श्रध्दांजली अर्पण केली.

‘मोती’ हा प्राणी नसुन वारघडे परीवारातील एक जिवाभावाचा सदस्य होता.परंतु मोती हा मागील काही दिवसांपासून अजारी होता त्याच्यावर उपचार चालू होते.त्याच्या अचानक जाण्याने वारघडे परीवार व वृक्ष मित्र यांना खुप दुःख झाले. मोतीच्या निधनामुळे बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वारघडे परीवाराचे वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अनेक मान्यवरांनी मोतीच्या आठवनींना उजाळा दिला.

मोती हा सर्व गुन संपन्न वृक्ष मित्र होता वारघडे यांचे दोन सरकारी अंगरक्षकाबरोबर हा तिसरा खाजगी विश्वासू अंगरक्षक होता,असे भावोद्गार जेष्ठ पत्रकार शरदराव पाबळे यांनी यावेळी काढले.

बकोरीचे डोंगरावर तो नियमित येत होता त्याठिकाणी गेले ५ वर्षांपासून वृक्षारोपण चालू आहे त्यासाठी मोतीही मदत करत होता.झाडाला खड्डा घेने,आळे करणे , खड्ड्यात झाड ठेवने अशाप्रकारची कामे मोती करत होता त्यामुळे तो बकोरीचे डोंगराचा ब्रॅंड ॲम्बेसेडर झाला होता.सोशल मिडिया वर त्याचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते.मोती गेल्याने त्याच्या स्मृती जपण्यासाठी व दुःख हलके करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.मोतीच्या स्मृती जतन करण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सदर शोकसभेसाठी जेष्ठ पत्रकार,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरदराव पाबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद,हवेली तालुका माहिती सेवा समितीचे अध्यक्ष कमलेश बहिरट,हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल, अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक भानुदास सरडे,पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर,गणेश जाधव, गणेश सातव,वनरक्षक वायकर साहेब,सतीश गायकवाड,गणेश बहीरट,सुनील वारघडे, प्रसाद वारघडे,संकेत वारघडे,सतीश जगताप,रवि सलगीरे, सुरेश चोधरी,सागर जाधव, संतोष वाघमारे,आकाश कटके व वारघडे परीवारातील मोतीवर जिवापाड प्रेम करणारे धनराज,धनश्री, चंद्रकांत वारघडे व त्याचेवर लहानपणापासून आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या सौ.माया वारघडे हे उपस्थित होते.वाघोलीवरुन आलेला मोतीचा मित्र टायगर यानेही मोतीचे दर्शन घेतले व शेवटचे त्याला पाहीले तो क्षण पाहण्यासारखा होता.

 

चंद्रकांत वारघडे यांनी सर्वांचे आभार मानले परंतु त्यांना आभार मानताना आपले अश्रू रोखता आले नाही शरदराव पाबळे यांनी त्यांना आधार दिला व शोकसभेची सांगता झाली.

Previous articleमराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन म्हसवड शहरामध्ये थाटामाटात संपन्न
Next articleक्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना नोकरी मिळण्यासाठी आमरण उपोषण