क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना नोकरी मिळण्यासाठी आमरण उपोषण

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू यांनी गेली ७ दिवस श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना नोकरी मिळावी यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. सदर आमरण उपोषणातील मागण्या संदर्भात मध्यम मार्ग निघावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, शालेय खेळ क्रीडा बचाव समिती महाराष्ट्र राज्य व शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांनी मध्यस्थी करून सदर उपोषण सोडावे याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपसंचालक सुहास पाटील यांनी खेळाडूंन सोबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार लवकरच शासन स्तरावर विचार करू असे आश्वासन दिले. त्यामुळे आमरण उपोषण खेळाडूंना नारळ पाणी देवून सोडण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सचिव नामदेव शिरगावकर, बाळासाहेब घुले, शालेय खेळ क्रीडा बचाव समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शाम भोसले, सचिव शिवाजीराव सांळुके, राजू ठोकळे तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अध्यक्ष संजय मोतलिंग, सदस्य विश्वनाथ पाटोळे, संजय कांबळे, रमेश बामणे व संजय मोरे, राष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने तसेच गुन्हे अन्वेषण शाखा पिंपरी चिंचवड चे सहा.पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे इत्यादी उपस्थित होते.

Previous articleबकोरीच्या डोंगरावर निसर्ग सेवा करणाऱ्या ‘मोती’ श्वानाला देण्यात आला अखेरचा निरोप
Next articleनामदेव भोसले यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव