कडबा कुट्टी मशीनमध्ये ओढणी अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

मंचर – आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे जनावरांसाठी कुट्टी करत असताना कुट्टी मशीनमध्ये ओढणी गुतून गळफास लागल्यामुळे एकवीस वर्षीय नवविवाहीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घडना घडली आहे.

सोनाली अजय दौंड (वय २१.रा. लाखणगाव, गव्हाळी मळा,ता. आंबेगाव पुणे) असे या नवविवाहीत महिलेचे नाव आहे.

सोनालीचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला होता. सोनाली जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी कुट्टी मशीनमध्ये चारा टाकत होती. दरम्यान तिच्या गळ्यातील ओढणी व केस मशीनमध्ये गुंतल्याने तिला गळफास लागला घरच्यांनी तिला कुट्टी मशीन मधून काढून खाजगी गाडीने उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. सहा महिन्यापूर्वी विवाह झालेल्या सोनालीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेत सिध्दार्थ बुचडे प्रथम
Next articleउरुळी कांचन मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा