उरुळी कांचन मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रम हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने उरुळी कांचन (ता.हवेली) येथील राम मंदिर येथे पार पडला. यावेळी बाळासाहेबांना सर्व उपस्थित यांच्या वतिने आदरांजली वाहण्यात आली व हवेली तालुक्यातील जुन्या जाणत्या जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, त्याचप्रमाणे विवध शासकिय समितीवर व पक्षाच्या विविध पदावर नियुक्ती झालेल्या शिवसैनिक आणि कोव्हिड काळात काम केलेल्या कोरोना योद्धांचा सन्मान यावेळी करण्यात आला. शिवसेनेच्या विचाराने प्रेरित होऊन उरुळीकांचन मा. ग्रा.सदस्य धनराज गुलाब टिळेकर यांचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश झाला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, महिला आघाडी जिल्हासंघटिका श्रद्धाताई कदम, तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, उपजिल्हाप्रमुख काळुराम मेमाणे, तालुका संघटिका छायाताई महाडिक, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब कांचन, संजय गांधी निराधार समिती सदस्य संजय कुंजीर, जिल्हा संघटक रमेश भोसले, महावितरण सल्लागार समिती सदस्य विपुल शितोळे, शिवसहकारसेना उपजिल्हाप्रमुख स्वप्निल कुंजीर, उपतालुकाप्रमुख विजय बगाडे, विभागप्रमुख श्रीकांत मेमाणे, शहरप्रमुख सचिन कांचन, उपविभागप्रमुख शिवाजी ननावरे, संतोष कानकाटे, खलिल शेख, राजेंद्र बोरकर, बापुसो तुपे, कृष्णा कांचन, भरत काळे, रमेश कांचन, मयुर गोते, मंगेश बगाडे, शरद कोलते, ऋषीकेश मुरकुटे, सुरेखाताई जुनवणे, रमेश तुपे, संजय गोलांडे आणि हवेली तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleकडबा कुट्टी मशीनमध्ये ओढणी अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
Next articleपोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हा सदस्यपदी सिमा यादव ; संघटकपदी नामदेव डोंगरे यांची निवड