विकास लवांडे यांचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद-हेमंत देसाई

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना काळात ज्यांनी कमालीचे काम केले अशांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रवक्ते विकास लवांडे यांचा समावेश करावा लागेल. या सद्गृहस्थांनी या काळात रुग्णांना बेड मिळवून देणे. शासकीय योजनांचा फायदा गोरगरिबांना मिळवून देणे. रास्त दरांत औषधे व इंजेक्शन्स वगैरेंची व्यवस्था करणे आणि मुख्य म्हणजे, खाजगी हॉस्पिटल्सच्या लुटीपासून रुग्णांचे संरक्षण करणे ही कामे केली. कोणाचीही जात,धर्म, पंथ, वर्ग याचा विचार न करता, हे साह्य केले. जवळपास पाच हजार रुग्णांची बिले, जी अव्वाच्या सव्वा होती, ती कमी करण्यात यश मिळवून, विकास लंवाडे यांनी रुग्णांचे एकूण अंदाजे २५ कोटी रुपये वाचवले. यापैकी ९० टक्के लोकांना विकास लंवाडे ओळखत देखील नव्हते.

हा खरा माणूसधर्म त्यासाठी प्रथम हॉस्पिटल व्यवस्थापनास विनंती करणे, अन्यथा रुग्णहक्क समितीच्या माध्यमातून तक्रार करणे, आंदोलन करणे, प्रसारमाध्यमांतून आवाज उठवणे अशी विविध तंत्रे त्यांनी वापरली. रात्रीचे दोन वा तीन वाजले असो, ते प्रत्येकाचे फोन घेत आणि मदतीला धावून जात. अगदी पुण्यापासून नागपूरपर्यंतच्या कोरोना रूग्णांना विकासजींनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. एका खाजगी हॉस्पिटलने तर लाखो रुपयांचे बिल लावले, तेव्हा जो रुग्ण दगावला होता, त्याच्या नातेवाईकांना पार्थिव घेऊ नका, असेही सांगून विकासजींनी त्या मनमानी करणार्‍या हॉस्पिटल व्यवस्थापनास नमवले. कारण या हॉस्पिटलने अक्षरशः बदमाषी करून रुग्णाला लुटले होते. या महामारीच्या काळात खाजगी हॉस्पिटल्सना काहीएक नियमावली आखून द्यावी, विशिष्ट टक्के बेड गोरगरिबांसाठी आरक्षित असलेच पाहिजेत, औषधे आणि एकूण उपचारांचे दर निश्चित करावेत, यासाठी त्यांनी सरकारकडे आग्रह धरला. त्याचप्रमाणे बिलांचे ऑडिट करावे, अशी मागणी करून, विकास लंवाडे तिचा पाठपुरावा केला. शेवटी प्रत्यक्षात ऑडिट होऊ लागले. विकास लंवाडे हे काम वेगवेगळ्या लोकांकडून मला कळत होते. हे काम करताना लवांडे यांना आपल्या पक्षाच्या प्रवक्तेपदाचाही फायदा झाला महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनने त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून प्रमाणपत्र दिले आणि त्यांचा सार्थपणे सत्कारही केला. हा माणूस प्रथम युक्रांदमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता होता. जवळजवळ पंधरा वर्षे डॉ कुमार सप्तर्षी यांच्या छायेखाली ते वाढले. तिथे पुरोगामी मूल्ये रुजली आणि त्यांची सामाजिक जाणीव टोकदार झाली. विकास लंवाडे यांचे सामाजिक कार्याचे मूळ तेथे आहे. हे सारे तिथून आले… ते एक साधे, पण आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता ते ग्रामीण भागातील मध्यमवर्गीयच आहेत.

ना बडे घराणे ना प्रचंड इस्टेट! तरीसुद्धा विकास लंवाडे यांनी केलेले काम केवळ रुपया-पैशात मोजता येणार नाही. त्यांनी असंख्य सामान्य स्थितीतील रुग्णांना एक प्रकारे जगवले, बरे केले आणि त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांमधील निराशा दूर केली. अशावेळी ‘ देव देव्हाऱ्यात नाही’ या ओळींची आठवण येते…

समाजाबद्दलचे, माणसांबद्दलचे त्यांचे हे जे प्रेम आहे ते बघता, ‘तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम’ अशी भावना त्यांनी ज्या अनेक लोकांना मदत केली, त्यांच्या मनात असणारच. फक्त स्वतःचा फायदा बघायचा, जग गेले खड्ड्यात, अशी वृत्ती सर्वत्र बघायला मिळत असताना, विकासजींचे हे काम डोळ्यांत भरते. एखादी घोषणा लोकप्रिय होऊन मतेही मिळतात, परंतु ‘सबका साथ सबका विकास’ हे शब्द खरे तर विकास लवांडे यांनाच लागू पडतात अशी माहिती हेमंत देसाई यांनी दिली.

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी
Next articleनिधन वार्ता- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांच्या मातोश्रीचे निधन