एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी

अमोल भोसले,उरुळी कांचन

बाळासाहेब आंबेडकर व प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार राज्यातील एसटी कामगारांनी पुकारलेल्या बंदला व त्यांच्या एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हवेली तालुका एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे पत्रक शिवाजीनगर एसटी डेपो येथे दिले.

आंदोलनाला पुणे जिल्हा सचिव राहुल ईनकर, हवेली तालुका अध्यक्ष संजय बबन साळवे, उपाध्यक्ष संजय भालेराव, उपाध्यक्ष सोपान गोगी, महासचिव विलास गायकवाड, कायदेशीर सल्लागार अॅड.सुजित कांबळे, सिध्दार्थ कांबळे, प्रसिद्धी प्रमुख विक्रम धेंडे आदींनी पाठिंबा दर्शविला.

Previous articleदरोडेखोराला पकडणाऱे पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी विशेष पुरस्कार देऊन केला सन्मान
Next articleविकास लवांडे यांचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद-हेमंत देसाई