रामभाऊ म्हाळगी विद्यालयाला इलेक्ट्रॉनिक साहित्याचे वाटप

राजगुरूनगर- महिंद्रा हेवी इंजिन्स लि.चाकण यांच्या सीएसआर फंडातून व यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक साहित्याचे वाटप शिक्षण विकास मंडळ संचलित रामभाऊ म्हाळगी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कडूस (ता.खेड) येथे करण्यात आले.


यावेळी महिंद्रा हेवी इंजिन्स कंपनीचे श्री.निलेश सातपूते यांनी आपल्या मनोगतात कंपनीचे धोरण सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अविनाश काळोखे यांनी भौतिक व शैक्षणिक सुविधांची उपलब्धता या विषयी माहिती देवून कंपनीस व यश फाउंडेशन यांना विदयालयास मदत करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी एन.,यश फाऊंडेशनचे श्री.धीरज पाटील, श्री.विजय तिदने, सरस्वती चौधरी मॅडम तसेच महिंद्रा हेवी इंजिन्स लिमिटेडचे प्रतिनिधी श्री.बळीराम चव्हाण ,श्री.गोरख नाणेकर,श्री. निलेश सातपूते आणि विद्यालयातील शिक्षक श्री अजिनाथ केदार श्री रामदास रेटवडे, श्री प्रविण काळे , श्री विष्णुपंत पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तानाजी कोळेकर तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री अनिल पोटे यांनी केले.

Previous articleशरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव ते मंचर लाँगमार्च
Next articleधर्मवीर संभाजी पतसंस्थेचा उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्कार गौरव