धर्मवीर संभाजी पतसंस्थेचा उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्कार गौरव

नारायणगाव : (किरण वाजगे)

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला दैनिक नवभारत वृत्तसमूहाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य सहकार परिषदेत ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.


महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि नवभारत वृत्तसमूहाचे मालक निमिष माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख,उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, संचालक प्रवीण डेरे मेहबूब काझी,सिताराम खेबडे, राजेश कोल्हे,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर औटी, बापूसाहेब गायकवाड, पत्रकार किरण वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवभारत वृत्तसमूहाने आयोजित केलेल्या राज्य सहकारी परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,मराठवाडा, कोकण मुंबई विभागातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्था व व्यक्तींना यावेळी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

धर्मवीर संभाजी पतसंस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे सभासद आणि शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे,जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, संस्थेचे सभासद व हितचिंतकांनी संस्थेचे विशेष अभिनंदन केले आहे.

Previous articleरामभाऊ म्हाळगी विद्यालयाला इलेक्ट्रॉनिक साहित्याचे वाटप
Next articleदौंड महाविद्यालयात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद