शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव ते मंचर लाँगमार्च

नारायणगाव ,किरण वाजगे

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या विरोधात सुरू केलेल्या विजजोड कनेक्शन खंडित करण्याच्या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ शिवसेना जुन्नर तालुका यांच्या वतीने नारायणगाव ते मंचर पायी मोर्चा काढण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांच्या समवेत तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, बाजार समितीचे उपसभापती दिलिप डुंबरे, आनंद रासकर, जीवन शिंदे, सरपंच योगेश पाटे,माजी उपसरपंच संतोष वाजगे, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, देविदास दरेकर, राजाराम बाणखेले, सचिन बांगर, विकी पारखे, कल्पेश बाणखेले, शोभा पाचपुते, ज्योत्स्ना महाबरे, खंडूशेठ शिंदे, हेमंत कोल्हे,आरिफ आतार, हेमलता सोनवणे तसेच शिवसेना पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे कनेक्शन खंडित करण्याचे धोरण अवलंबविले आहे.ते थांबविले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद सोनवणे यांनी दिला आहे.

Previous articleओबीसींच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी जनजागृती अभियान
Next articleरामभाऊ म्हाळगी विद्यालयाला इलेक्ट्रॉनिक साहित्याचे वाटप