ओबीसींच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी जनजागृती अभियान

अमोल भोसले,उरुळी कांचन

पंढरपूर येथून (दि.९) पासून ओबीसी जागर अभियानाची सुरूवात करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात येत असून आज उरुळी कांचन शहरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या अभियानाच्या वाहनाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडी अध्यक्ष विकास जगताप, सदस्य क्षेत्रीय रेल्वे समिती अजिंक्य महादेव कांचन, भाजपा उरळी कांचन शहराध्यक्ष अमित सतीश कांचन, भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश बाळासाहेब शेळके, भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष शुभम बाळासाहेब वलटे, सुनील तुपे, भानुदास जगताप, युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश कानकाटे, ओबीसी मोर्चा भाजप तालुका अध्यक्ष जयेश जाधव, अवधूत राऊत, कुणाल वनारसे, शेखर टिळेकर , यांच्या सह ग्रामस्थ, मित्र परिवार, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ओबीसी जागर अभियान रथाचे स्वागत व नारळ फोडुन हार वाहाण्यात आला.

Previous articleपवनानगर बस स्टाँपच्या कडेला अनोळखी मृतदेह आढळला
Next articleशरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव ते मंचर लाँगमार्च