दौंड तालुक्यातील यवत व स्वामीं चिंचोली येथील कोविड सेंटर ला मा.रमेश(आप्पा) थोरात यांची भेट

Ad 1

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

दौंड तालुक्यातील यवत व स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार-मा.रमेश आप्पा थोरात यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली,व आवश्यक त्या सूचना दिल्या.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तालुक्यातील कोविड सेंटर ला गरम पाण्याचे फिल्टर देण्याचे जाहीर केले,दौंड मध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे, रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन,व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही, खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेणे,बेड न उपलब्ध करून देणे अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत,या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांवरती प्राधान्य देणे,लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना शक्य असल्यास कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात यावे असे आदेश दौंड पंचायत समिती सभापती सौ.आशाताई शितोळे व उपसभापती मा.नितीन भाऊ दोरगे यांनी प्रशासनास दिले आहेत.दौंड तालुक्यामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता,तत्काळ उपचार व्हावेत, रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे,तसेच आरोग्य विषयी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे,राज्यसरकर,जिल्हापरिषद, पंचायत समिती याद्वारे मिळणाऱ्या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होतात की नाही याची माहिती या पाहणी दौऱ्यात घेण्यात आली,कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले,यातच रमेश आप्पा थोरात यांनी प्रत्येक कोविड सेंटरला गरम पाण्याचे फिल्टर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

हा पाहणी दौरा माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वैशाली ताई नागवडे,दौंड पंचायत समिती सभापती-सौ.आशाताई शितोळे, उपसभापती नितीन भाऊ दोरगे,पंचायत समिती सदस्य-मा.प्रकाश नवले,सुशांत दरेकर, झुंबर गायकवाड ,निशाताई शेंडगे,मुलाणी साहेब,उपस्थित होते, यावेळी प्रशासनाने राबविलेल्या विविध योजनेची व करण्यात येत असलेल्या अंमलबजावणी ची माहिती दौंड पंचायत समिती चे गटविकास अधिकारी-मा.गणेश मोरे,तालुका आरोग्य अधिकारी-अशोक रासगे,यांनी दिली