राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्ट्राचारच्या पुणे जिल्हा काेषाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

-राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्ट्राचार निवारण (भारत )च्या पुणे जिल्हा काेषाध्यपदी सुभाष कदम यांची निवड करण्यात आली. दाैंड तालुक्यातील आलेगाव येथील रहिवाशी श्री.सुभाष विनायक कदम हे गेली तीस वर्षांपासून सहशिक्षक पदावर कार्यरत असून त्यांनी विविध संस्थामध्ये गरजू विद्यार्थ्यांना,लाेकांना मदतीचा हात देत असतात.त्यांना त्यांच्या आई-वडीलांकडून सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,व सांस्कृतिक कार्याचा वारसा मिळाला आहे. त्यांनी यापुर्वी अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांमध्ये कामकाज केलेले आहे.

दाैंडतालुका पंयायत समितीचा आदर्श शिक्षक,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हा गुणवंत शिक्षक,राजीव गांधी सामाजिक कार्यरता, पर्यावरण मित्र अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गाैरविण्यात आले आहे.याची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्ट्राचार निवारण(भारत)चे प्रदेशाध्यक्ष श्री.रमेश गणगे,उपाध्यक्ष यशवंत कुंभार,युवक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मदने, सचिव लक्ष्मण सुरवसे,सदस्य धाेंडिबा कटके, यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल टी. डी.एफ व महाविकास आघाडीचे पुरस्कृत अधिकृत उमेदवार श्री.जी.के.थाेरात सर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,दाैंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ, दाैंड तालुकाध्यक्ष दपक खैरे,बारामती तालुकाध्यक्ष अनिल कामठे,सुभाष भाेसले सर, सर्व शिक्षक,सेवकवर्ग,व आलेगाव, देऊळगाव राजे ग्रामस्थ,मित्रपरिवारांच्या वतीने अभिनंदन करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleकोरोनात आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत
Next articleदौंड तालुक्यातील यवत व स्वामीं चिंचोली येथील कोविड सेंटर ला मा.रमेश(आप्पा) थोरात यांची भेट