नारायणगाव मध्ये आज मोठ्या प्रमाणावर पाऊस

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव व परिसरामध्ये आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. पावसाचा जोर एवढा होता की, वारूळवाडी येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते तर नारायणगाव पूर्व वेशी समोरील रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. या पावसामुळे काही दुकानांमध्ये पाणी गेले. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे काहीप्रमाणात नुकसान झाले.
नारायणगावचा रोजचा भाजीबाजार हा मुक्ताई मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर भरतो. मात्र कोरोनामुळे हाच बाजार मुक्ताईदेवी यात्रा ज्याठिकाणी भरते तेथे सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे या सर्व भाजीपाला व्यापार्‍यांची तसेच ग्राहकांची त्रेधातिरपीट उडाली. रोज भरणाऱा भाजीबाजार हा योग्य जागी भरावा अशी मागणी व्यापारी व ग्राहकांकडून केली जात आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे सध्या ज्या ठिकाणी बाजार भरतो तेथे काही चारचाकी गाड्या पाणी साचल्यामुळे अडकल्या देखील होत्या. या गाड्या अखेर जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्या.

Previous articleदौंड तालुक्यातील यवत व स्वामीं चिंचोली येथील कोविड सेंटर ला मा.रमेश(आप्पा) थोरात यांची भेट
Next articleतुळशीराम चौधरी यांची श्रीदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड