बी.डी.काळे महाविद्यालयात लसीकरण मोहिमेचे आयोजन

घोडेगाव – विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आणि पंचायत समिती आरोग्य विभाग,प्राथमिक आरोग्य केंद्र,लांडेवाडी यांच्या सौजन्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बुधवार (दि.२७) रोजी सकाळी ठिक १० वा.ग्रंथालयात मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आय.बी. जाधव यांनी दिली.

कोविड लशीकरण मोहिम,मिशन युवा स्वास्थ अंर्तगत महाविद्यालयामध्ये कोविशिल्ड लस मोफत दिली जाणार आहे. तरी ज्या विद्यार्थांनी अद्याप लशीचा एकही डोस घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांनी मोबाईल व आधार कार्ड घेऊन महाविद्यालयातील ग्रंथालय इमारतीमध्ये उपस्थित राहावे.

ज्या विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दुसरा डोस दिला जाईल.विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी येताना नाष्टा किंवा हलके जेवण करून यावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleभागेश्वर सहकारी दुध उत्पादक संस्थेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला – खा. डॉ. अमोल कोल्हे
Next articleअष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात भाविकांची गर्दी