अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात भाविकांची गर्दी

अमोल भोसले,उरुळी कांचन

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने भाविक मोठ्या प्रमाणत थेऊर (ता.हवेली) येथील चिंतामणीच्या दर्शणासाठी दाखल झाले होते. लॉकडाऊन नंतर मंदिर उघडले. मंदिर उघडल्यानंतर पहिल्यांदाच चतुर्थी असल्याने व पहाटेच्या वेळी अजय आगलावे यांच्या हस्ते चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ची पूजा करून सकाळी सहापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास अशी सजावट करण्यात आली होती.

अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच गर्दी केली होती. देवस्थानच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जात आहे अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी दिली.

यावेळी मंदिर परिसरात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंदिर परिसरात चौकट आखण्यात आले होते. थर्मल टेम्प्रेचर गण, पिण्याचे पाणी, स्वच्छता ग्रह, यांची सोय करण्यात आली होती. तसेच चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिर प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. यावेळी ध्वनीक्षेपकावरून भाविकांना वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या.

Previous articleबी.डी.काळे महाविद्यालयात लसीकरण मोहिमेचे आयोजन
Next articleवाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी या उपाययोजना करा – उपविभागीय पो. अधिकारी मंदार जावळे