कोरोनात आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत

मंचर-एकीकडे करोणा ची भीती आणि दुसरीकडे बिबट्याची दहशत अशी अवस्था आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे, आज सकाळी नऊच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील सतीश भेके यांना आपल्या उसाच्या शेतात बिबट्या दिसल्याने त्यांचे तारांबळ उडाली नशीब बलवत्तर होते म्हणून ते बिबट्याच्या तावडीत सापडले नाही.

आंबेगाव तालुका हा एक प्रकारे बिबट्या प्रवण क्षेत्र झाला आहे तालुक्यातील चास,महाळुंगे पडवळ, साकोरे, कळंब,लौकी, चांडोली, पिंपळगाव , निरगुडसर,अवसरी बुद्रुक, पोंदेवाडी, भराडी,जवळे आधी गावात बिबट्याचे वारंवार होणारे शेतकऱ्यांच्या जनावरावरील हल्ले, मानवावर हल्ले यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असताना वनविभाग मात्र पंचनामा व्यतिरिक्त काहीच करत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, आज सकाळी नऊच्या सुमारास निरगुडसर येथील शेतकरी सतीश यशवंत भेके आपल्या घोड नदी पात्र नजीक असणाऱ्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना शेतातील पाटामध्ये प्राण्यांचे निशान आढळले, पंजाचे निशाण पाहत असतानाच अचानक समोर त्यांना बिबट्या दिसला मात्र शेतकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली हातात काठी असल्याने काठीचा आवाज व आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली, सध्या शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे तर दुसऱ्या बाजूला बिबट्याने केलेल्या जनावरावरील हल्ल्यापासून शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत आहे, सदर घटनेची वनखात्याने तातडीने दखल घेऊन याठिकाणी पिंजरा बसवावा अशी मागणी माजी उपसरपंच रामदास वळसे-पाटील यांनी केली आहे.

Previous articleनातेवाईकांनी नकार दिल्याने मंचरचे सरपंच दत्ता गांजळे यांनी कोरोना संशयितावर केला अंत्यसंस्कार
Next articleराष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्ट्राचारच्या पुणे जिल्हा काेषाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड