नातेवाईकांनी नकार दिल्याने मंचरचे सरपंच दत्ता गांजळे यांनी कोरोना संशयितावर केला अंत्यसंस्कार

मंचर-रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असते तेच माणसाला  माणूस बनवते.काल याची प्रचिती पुन्हा एकदा मंचर शहरात आली शेजारील तालुक्यातील दोन कोरोना संशयित रुग्णांचा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.येथील ड्युटीवर असणाऱ्या महिला डॉक्टर ने मंचर चे सरपंच दत्ता गांजाळे  यांना ही गोष्ट फोनद्वारे सांगितली.कोरोना योद्धा म्हणून सतत युद्ध भूमीवर सेवारत असणारे सरपंच यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाइकांशी चर्चा केली.. दोन्ही रुग्ण कोरोना  संशयित असल्यामुळे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात  शासकीय नियमाप्रमाणे देता येत नसल्याने. त्याचप्रमाणे नातेवाईकांनीही आपल्या गावी नेण्यास असमर्थता दाखवल्यामुळे शेवटी मंचर मधील पवित्र अशा तपनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.

सरपंच व  त्याचे सर्व तरुण सहकारी मित्र यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तोपर्यंत एका कुटुंबातील बरेचसे नातेवाईक जमा झाले होते तर दुसऱ्या कुटुंबातील मयत झालेल्या बाबांचा मुलगा खूप वर्षापूर्वी मयत झाल्यामुळे त्या बाबांच्या नातेवाईकांमध्ये फक्त त्यांची मुलगी व सून उपजिल्हा रुग्णालयात असल्यामुळे त्याचा  अंत्यसंस्कार कोणी करायचा हा मोठा प्रश्न होता?.. पण पहिल्या कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीचा मुलगा सोडून इतर नातेवाईकांनी मृतदेहाला हात लावण्यात असमर्थता दाखवल्यामुळे त्या मयत व्यक्तीच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला आधार देण्यास तसेच अंत्यसंस्कार साठी पुढे येण्यास नातेवाईक तयार झाले नाही..प्रत्येक नातेवाईक आपल्या जीवाला घाबरुन जबाबदारी नाकारत होता , प्रवृत्ती मध्ये साहस आणि मनात माणुसकीची ज्योत सतत तेवत ठेवणारे मंचरचे  सरपंच दत्ता गांजाळे स्वतः अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामीण रुग्णालयात जाऊन दोन्ही कोरोना  संशयित रुग्णांचे मृतदेह icu  वॉर्डातून स्वतः व ॲम्बुलन्स चालक गौरव बारणे व बजरंग दल आंबेगाव प्रखंडचे वीर बजरंगी अक्षय चिखले त्यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय बाहेर आणले.मंचरच्या  पवित्र अशा तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये दोन्ही मृतदेह आणल्यानंतर हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे दोन्ही मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.. पहिल्या मयत व्यक्तीचा मुलगा व पत्नी सोडून.. व दुसऱ्या मयत व्यक्तीच्या मुलगी व सून सोडून इतर  नातेवाईकांनी स्मशानभूमीच्या बाहेर रोडवर राहनेच  सुरक्षित समजलं.. आज पर्यंत टीव्हीवर किंवा सोशल मीडियात आपण कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार करताना पाहिले.. काही क्षण पाहवले सुद्धा नाही अशाप्रकारे अंत्यसंस्कार केले गेले.. पण मंचर चे भूमिपुत्र सरपंच व त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी रक्ताच्या नात्या प्रमाणे व सर्व हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.. माणसाला देव मानणारा व निराश्रीताना मायेचा आधार देणारे मंचर चे  सरपंच दत्ता गांजाळे  यांनी स्वतः दोन्ही कोरोना संशयित रुग्णांच्या चितेला मुखांग्नि दिला.

तसेच सर्व नातेवाईकांना ऍम्ब्युलन्स ने  त्यांच्या त्यांच्या गावी पाठवले कुणाकडूनही अंत्यविधीचा कुठलाही खर्च घेण्यात आलेला नाही यामुळे मंचरकारांमध्ये किती माणुसकी जिवंत आहे. ती पाहावयास मिळाली.अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या कुटुंबातील मृत व्यक्तीच्या मुलीने व सूनेने सरपंचांचा निरोप घेताना काढलेला वाक्य खूप महत्त्वाचे  आहे त्या म्हणाल्या “आमचे बाबा खरंच भाग्यवान आज तुमच्या हातून त्यांना मुखाग्नी मिळाला त्यांच्या मुलाची जागा तुम्हीआज  भरून काढली, रक्ताच्या नात्या प्रमाणे माणुसकीचे नाते निभावले “

          ही सर्व गोष्ट मन सुन्न करणारीआहे.आय सी यु मध्ये मृतदेह घेण्यासाठी गेल्यावर आजूबाजूचे रुग्ण घाबरलेल्या अवस्थेत पाहून अशा प्रतिकूल परिस्थितीत मायेने आपुले पणाने  सरपंचांनी सर्वांना धीर दिला..कोरोना ग्रस्तांचे जीवन म्हणजे सामाजिक अव हेलनेचे टोकाचे रूप, पण हा विचार दूर ठेवून स्वतःच्या पायी फ्रॅक्चर असतानासुद्ध.. एक लोकप्रतिनिधी समाजासाठी काय करू शकतो याचे उदाहरण समाजापुढे दिले.

 गौरव बारणे, अक्षय चिखले, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लोंढे, महेश घोडके, आकाश मोरडे, ऋषिकेश शेटे, राहुल थोरात, शुभम बाणखेले,जयेश भालेराव, अकिल सय्यद सैफ शेख, मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश डावखर साहेब.यांनी या कार्यास मदत केली

Previous articleलांडेवाडी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाने १७ वर्षे शंभर टक्के निकालाची दैदीप्यमान परंपरा जपली
Next articleकोरोनात आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत