कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्वेलर्सच्या दुकानावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्रीला आमंत्रित करून तसेच तिची मिरवणूक काढून लोकांना आकर्षित करणाऱ्या व प्रचंड गर्दी करून कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरलेल्या एका ज्वेलर्स दुकानावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, नारायणगाव येथील बसस्थानकाजवळ नव्याने सुरू झालेल्या एका ज्वेलर्स व्यवसायाच्या उद्घाटनप्रसंगी “मराठी अभिनेत्रीला कार्यक्रमाला बोलावून मिरवणूक काढून गर्दी केल्या प्रकरणी “एका ज्वेलर्स” दुकानावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

राजगुरूनगर येथील प्रथमेश अनिल जवळेकर यांनी नारायणगाव येथे नवीन व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आमंत्रित केले होते.उद्घाटक सेलिब्रेटीच्या स्वागतासाठी ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक देखील काढण्यात आली. मिरवणुकित ढोल ताशा वाजवणारांनी मास्क घातले नाही. या उलट अभनेत्रीला उद्घाटनप्रसंगी आमंत्रित करून गर्दी केली. कोरोनाचे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करून, गर्दी जमवल्यामुळे कोरोना संसर्गजन्य परिस्थिती निर्माण करण्यास भाग पाडले प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८,२६९ २७० अन्वये गुन्हा दाखल केला आला आहे.

या प्रकरणी नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी फिर्याद दाखल केली आहे.या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार कैलास ढमाले करीत आहेत.

Previous articleदुचाकीचा धक्का लागल्याने चारचाकीतील तिघांची तरूणाला बेदम मारहाण; मारहाणीत तरूणाचा मृत्यू
Next articleपश्चिम महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियान समितीच्या अध्यक्षपदी राहुल शेवाळे यांची निवड