पश्चिम महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियान समितीच्या अध्यक्षपदी राहुल शेवाळे यांची निवड

अमोल भोसले, उरुळी कांचन

स्वच्छ भारत अभियान समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय संयोजक खासदार यशवंत सिंह दरबार यांच्या हस्ते व राजेंद्र फडके, राजेश झा यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवाळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मच्छिंद्र दगडे पाटील, प्रदेश संयोजक सचिन देशपांडे, विजय कुलकर्णी, वैभव मुरकुटे, कांचन कुंबरे, स्वप्नील शहा, किरण दगडे, प्रसाद सरमोदक आदी उपस्थित होते.

गडकिल्ल्यांचे संवर्धन – स्वच्छता – आरोग्य – शिक्षण याबाबत प्रामुख्याने काम काम करणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

Previous articleकोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्वेलर्सच्या दुकानावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleसराफी दुकानात चोरी करणाऱ्या चौघांना शिताफीने अटक