सराफी दुकानात चोरी करणाऱ्या चौघांना शिताफीने अटक

गणेश सातव,वाघोली,पुणे

शहरातील सराफी दुकानात नजर चुकवून दुकानातील सुवर्णालंकाराची चोरी करणे,दुकानातील ग्राहकांच्या बँगेमधील मौल्यवान वस्तू चोरणे आदी गुन्हे दाखल असलेल्या चौघांना गुन्हे शाखा युनिट-६ पथकाने पारनेर येथे सापळा लावून जेरबंद केले.
आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करुन वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेला जवळपास २२,५०,०००/- (बावीस लाख पन्नास हजार रुपये) किंमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल व एक चारचाकी टाटा झेस्ट गाडी,किंमत ३,५०,०००/-(तीन लाख पन्नास हजार रुपये)जप्त करण्यात आली आहे.

पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गु.र.क्रं-१५४/२०२१ भा.दं.वि.३८९,३४ या गुन्ह्याचा तपास करत असताना
सुरेखा ज्ञानेश्वर पवार(वय-२९) मु-रामगव्हाण,पो-नालेवाडी,ता-अंबड,जि-जालना, नंदा किशोर पवार(वय-२६)मु.पो-वडीगोद्री,ता-अंबड,जि-जालना, ज्ञानेश्वर अंगद पवार(वय-३०) मु-रामगव्हाण, पो-नालेवाडी, ता-अंबड,जालना, किशोर शिवदास पवार(वय-२७) मु.पो-वडीगोद्री,ता-अंबड,जालना या चौघांना गुन्हे शाखा युनिट-६ च्या तपास पथकाने पारनेर येथे मोठ्या शिताफीने अटक केली.
अटक केल्यानंतर न्यायालयाने तपासकामी पोलीस कोठडी ठोठावली आहे.

जालना,बीड,नाशिक,नगर,पुणे आदी विविध ठिकाणी सराफी दुकानात आरोपींनी सुवर्णालंकाराची चोरी केली होती.

सदर कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सो.,सह आयुक्त रविंद्र शिसवे,अतिरिक्त पोलीस आयुक्त(गुन्हे)रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त(गुन्हे)श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे-२)लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरिक्षक गणेश माने,सहाय्यक पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुधीर टेंगले,अमंलदार मच्छिंद्र वाळके,विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे,कानिफनाथ कारखिले,नितीन शिंदे,नितीन मुंढे,बाळासाहेब सकटे,प्रतिक लाहिगुडे,ऋषिकेश ताकवणे,ऋषिकेश व्यवहारे,सचिन पवार,ऋषिकेश टिळेकर,शेखर काटे,नितीन धाडगे,सुहास तांबेकर,ज्योती काळे यांनी केली

Previous articleपश्चिम महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियान समितीच्या अध्यक्षपदी राहुल शेवाळे यांची निवड
Next articleपत्रकारांच्या आंदोलनाचा दणका;बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन नव्या शाखा सुरू होणार