दुचाकीचा धक्का लागल्याने चारचाकीतील तिघांची तरूणाला बेदम मारहाण; मारहाणीत तरूणाचा मृत्यू

अमोल भोसले,उरुळी कांचन

चारचाकीला दुचाकीचा धक्का लागला या शुल्लक कारणांवरून भांडण करुन, चारचाकीतील तिघांनी तरूणांस हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारुन त्याचा खुन केला असल्याची घटना उरुळी कांचन – भवरापुर रोडवर बगाडे वस्ती येथे घडली आहे.मारहाणीत अक्षय अंकुश टिळेकर (वय २१, रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) याचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी अमर अंकुश टिळेकर ( वय २४ रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तीन अनोळखी इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८ – ३० वाजण्याच्या सुमारांस अमर घरी असतांना चुलत भाऊ प्रशांत टिळेकर याने अक्षयला बगाडे मळ्याच्या पाटीपाशी तिघे मारहाण करीत असल्याचे कळवले. तो तातडीने चुलत भाऊ धमेंद्र यास घेऊन घटनास्थळी पोहोचला.तेथे लोक जमा झाले होते. त्यावेळी अक्षय यास मारणारे तिघे कारमध्ये बसताना अमरने पाहिले. ते भवरापुरचे दिशेने निघून गेले. त्यावेळी अमरसह काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी वेगात गेल्याने त्यांना थांबवता आली नाही. त्यानंतर अमरने लोकांकडे विचारपूस केली. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून भांडण करत कारमधील तिघांनी अक्षय मारलं असल्याचे लोकांनी सांगितले.

अक्षय रस्त्याच्या कडेला निपचीत पडला होता. त्यांस रूगणवाहिकेतून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन येथे नेले. तेथे सुविधा नसल्याने खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. सदर ठिकाणी तपासणी करुन डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करत आहेत.

Previous articleजुन्नर मधील चार शिक्षकांचा जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
Next articleकोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्वेलर्सच्या दुकानावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल