देशातील सर्वात मोठा राजकिय पक्ष म्हणून भाजपची वेगळी ओळख – संदीप भोंडवे

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील सुवर्णा कैलास कांचन यांची हवेली तालुका महिला मोर्चा सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी, कविता शरद खेडेकर यांची उरुळी कांचन महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी तर ऋषिकेश ढवळे यांची उरुळी कांचन शहर कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील भाजपच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे व भाजप हवेली तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुप्रिया गोते यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाति मोर्चाच्या सचिव सारिका लोणारी, पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, पुणे जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, भाजप शहर अध्यक्ष अमित कांचन, शहर विद्यार्थी अध्यक्ष ऋषिकेश शेळके, सोशल मिडिया शहर अध्यक्ष शुभम वलटे, शरद खेडेकर, भाऊसाहेब कांचन, सुनील तुपे, शिवाजी गोते, पूजा सणस, निर्मला कांचन, ओंकार कांचन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप भोंडवे म्हणाले, देशातील सर्वात मोठा राजकिय पक्ष म्हणून भाजपची वेगळी ओळख आहे. तसेच सर्वात जास्त सभासद याच पक्षात आहेत. सर्वसामान्यांपर्यंत पोचून आपल्याला पक्षाचे काम वाढवायचे आहे. जास्तीत जास्त लोकांना संधी देऊन पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. असे भोंडवे यांनी सांगितले.

तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या पदाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना सुवर्णा कांचन यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ दिपावलीच्या स्वागतासाठी सज्ज
Next article१९७५ साली एसएससी मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन