महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ दिपावलीच्या स्वागतासाठी सज्ज


पुणे- कोरोना आणि लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या लोकांना आणि पर्यटकांना शासनाने दिलासा दिला आहे. कोरोना चा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्याचबरोबर महामंडळाने पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या असल्यामुळे आगामी काळात आता पर्यटनास बहर येणार आहे. गुलाबी थंडीची चाहुल आणि दिपावलीच्या सुटटीचे वेध पर्यटकांना लागले असल्याने पर्यटकांची पावले थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गाकडे वळत आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही थंडी आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपुर्वीच महामंडळाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पर्यटक केद्रस्थानी ठेवुन “अतिथी देवो भव” या नात्याने पर्यटकांना नेहमीच सर्वोत्त्म सुविधा देण्यासाठी तयार असलेल्या महामंडळाची नवीन संकेतस्थळामुळे नव्याने ओळख होत आहे. बऱ्याच नवीन सुविधांसह संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. यापुर्वी ज्या त्या दिवसाचे आरक्षण करता येत नव्हते, मात्र आता नवीन संकेतस्थळावरुन सुट उपलब्ध असल्यास पर्यटनासाठी घरातुन बाहेर पडतानाही आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण आलेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पर्यटकांचा दिपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळे आगामी हिवाळी हंगाम आणि दिपावलीच्या सुटटीसाठी आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे. दसरा आणि दिवाळी च्या सुटटयांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. कोरोना नियंत्रणात राहील्यामुळे आक्टोबर, नोव्हेबर – डिसेंबर पासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरु होणार आहे.


हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही हिवाळी पर्यटन आणि दिपावली सुटयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.


सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट” ची सुरवात दि. 1/10/2021 पासुन सुरु केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत.

मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे.

उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्था पुर्वीपासुनच करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींग चीही सोय करण्यात येणार आहे.

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरु असुन www.mtdc.co या वेबसाईटर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार असुन पर्यटकांसाठी “ कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट” सह नाविन्यपुर्ण अशा वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत.”

श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Previous articleवीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन
Next articleदेशातील सर्वात मोठा राजकिय पक्ष म्हणून भाजपची वेगळी ओळख – संदीप भोंडवे