बहुप्रतिक्षित पिढ्यानपिढ्या गोसासी, वाकळवाडी, वरुडे रस्त्याची दुरवस्था संपून काम मार्गी लावणार – निर्मला पानसरे

बाबाजी पवळे, राजगुरुनगर-खासदार अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी बहुप्रतिक्षित पिढ्यानपिढ्या गोसासी वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था संपून आता गोसासी, वाकळवाडी,वरुडे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम  करणार आहे.

पंतप्रधान सडक योजनेतून दळण वळण व परिसराचा विकास जलदगतीने होण्यासाठी रस्तेविकास हा अत्यंत महत्वाचा घटक असुन देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये रस्त्याची फार मोठी मोलाची भूमिका असुन दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाडी,वस्ती, गावांमध्ये डांबरीकरण पक्क्या व मजबुत रस्त्यांचे काम मार्गी लावणार असल्याचे निर्मला पानसरे यांनी सांगितले

स्वातंत्र्य काळापासून रस्त्यापासून वंचित राहिलेल्या गावांना आता विकासाला चालना मिळणार आहे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी स्वतः डोंगराळ तसेच ग्रामीण भागाची पहाणी करून गावांना भेट दिली सत्य परिस्थिती अनुभवली, गेले अनेक वर्षे गणेशदरा,ठाकरवाडी करांना तर जीव मुठीत धरून वरूड्याकडे जाण्यासाठी डोंगरातून प्रवास करावा लागत असे तसेच एखाद्या रुग्णाला रुग्णालयापर्यंत न्यायचे झाल्यास तर अतिशय जिगरीचे काम होते व कसरत करावी लागत तसेच पावसाळ्यात रस्ता शोधावा लागत ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने या सर्व गावांच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच अध्यक्ष निर्मला पानसरे यांचे सर्वत्र कौतुक व आभार करण्यात येत आहेत.

आम्ही अनेक वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत होतो खूप अडचणी व खडतर प्रवास या रस्त्याने करावा लागत शालेय विद्यार्थी असो किंवा आबालवृद्ध असेल सर्वांना रस्त्या विना खूप त्रास सोसावा लागत असे परंतु निर्मला पानसरे यांनी आमची दखल घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे यावेळी आनंदा पडवळ यांनी आपले मत व्यक्त केले

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने या सर्व गावांच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच अध्यक्ष निर्मला पानसरे यांचे सर्वत्र कौतुक व आभार करण्यात येत आहेत

तसेच येथील प्रसिद्ध शिवतीर्थ – धार्मिकस्थळ वाळकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता व हनुमान मंदिरासमोर सभागृह शेडचे काम करणार असल्याचेही पानसरे यांनी यावेळी नागरिकांना सांगितले तसेच ग्रामपंचायतीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा वाळकेश्वर देवस्थानास तिर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यात कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी निर्मला पानसरे यांनी मत व्यक्त केले

यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती अरुण चांभारे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दशरथ गाडेपाटील, माजी पंचायत समिती सदस्य माऊली गोरडे, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, ॲड.सुखदेव पानसरे, ॲड.नामदेव वाडेकर, ॲड.सतिश गोरडे, ॲड.सचिन पवळे, पांडुरंग कोरडे, शाम पवळे, पी.डी.पवळे, बाबासाहेब गोरडे, सिताराम वाळुंज,गणेश कोरडे, महेंद्र वाळुंज, गोसासीचे उपसरपंच संतोष गोरडे,रविंद्र गोरडे, मारुती गोरडे,वरुड्याचे माजी उपसरपंच रुपेश तांबे,संतोष तांबे यांच्यासह वाकळवाडी, गोसासी व वरुड्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleकोरोणा विरुद्धची लढाई ही शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे   -खासदार डॉ.अमोल कोल्हे
Next articleस्व. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्याची खा. डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी