कोरोणा विरुद्धची लढाई ही शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे   -खासदार डॉ.अमोल कोल्हे

नारायणगाव  (किरण वाजगे)

कोरोना बाबत आपण गाफील न राहता तसेच शासनावर किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःहून कोरोनाशी लढा देण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केले.
महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री महिला कोवीड सेंटर साठी ५१ सुसज्ज बेड व ५१ वाफेचे मशीन प्रदान सोहळा आज नारायणगाव येथे पार पडला. यावेळी डॉक्टर कोल्हे बोलत होते.

खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, जुन्नर तालुका महात्मा फुले विचारमंचे पदाधिकारी तसेच ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, आंबेगावच्या तहसीलदार तथा प्रभारी प्रांताधिकारी रमा जोशी, तहसीलदार हनुमंत कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती संजय काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार,  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, रमेश भुजबळ, गट विकास अधिकारी हेमंत गरिबे , डॉक्टर श्याम बनकर, डॉ वर्षा गुंजाळ, महात्मा फुले विचार मंचचे अध्यक्ष व माजी सरपंच आत्माराम संते, एमडी भुजबळ, विघ्नहर कारखान्याचे  संचालक शरद  फुलसुंदर, विजय कोल्हे, संदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महात्मा फुले विचारमंच जुन्नर तालुक्याच्या वतीने सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ५१ सुसज्ज बेड व ५१ वाफेचे मशीन प्रदान करण्यात आले हा कार्यक्रम नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालयात पार पडला.

या कार्यक्रमात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कोरोना बाबत करावयाच्या उपायोजना तसेच कोरोना बाबत प्रशासकीय पातळीवर कशाप्रकारे उपचार केले जातात याची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी आमदार अतुल बेनके आशा बुचके अनिल तात्या मेहेर संजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बी. एल. म्हस्के यांनी केले तर आभार हेमंत भास्कर यांनी मानले.

Previous articleडॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुळा
Next articleबहुप्रतिक्षित पिढ्यानपिढ्या गोसासी, वाकळवाडी, वरुडे रस्त्याची दुरवस्था संपून काम मार्गी लावणार – निर्मला पानसरे