सीएसटीपीएल फाउंडेशनच्या माध्यमातून दौंडला पहिली आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू

सचिन आव्हाड

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील पहिल्या rt-pcr प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 7 रोजी डॉक्टर डी. एस. लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा.श्री.कृष्णकुमार बुब – संचालक क्लीन सायन्स अँड टेकनॉलॉजि उपस्थित होते.

 सुविधा सीएसटीपीएल फाउंडेशन व क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सीआरएस फंडातुन उपलब्ध केली आहे.

यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर समीर कुलकर्णी, लॅबचे संचालक डॉक्टर डी. लड्डा, डॉक्टर श्रीमती. पी. पी. भंगाळे, डॉक्टर श्रीमती. एस.आर. कुलकर्णी उपस्थित होते.

सीएसटीपीएल फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमाचे दौंडकर जनतेने भरभरून कौतुक केले आहे. यापूर्वी दौंड तालुक्यातील प्रयोगशाळा धारकांना व नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीचे नमुने जमा करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये जावे लागत होते. त्यामुळे अवहाल मिळण्यास वेळ जातो, त्यामुळे अनेक रुग्णांवरती उपचार करताना डाॅक्टरांना योग्य त्या उपचार पद्धतीचा अवलंब करता येत नव्हते, आता मात्र सीएसटीपीएल फाउंडेशनच्या या उपक्रमाने ग्रामीण भागातील ही सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांना चाचणीचे अवहाल तात्काळ मिळुन रुग्णांना फायदा होणार आहे… तसेच या प्रयोगशाळेचा फायदा पुणे जिल्ह्यातील पूर्व भागालाही होणार आहे.

यापूर्वीही सीएसटीपीएल फाउंडेशन व क्लीन सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने लॉकडाउन काळात अनेक नागरिकांना मोफत जेवणाची व निवार्‍याची सोय करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी सीआरएस फंडाच्या माध्यमातून शैक्षणिक सुख सुविधा, वर्गखोल्या, वृक्षारोपणसाठी रोपे वाटप, नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होणेसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प, ग्रामीण भागांमधील मुलांना संगणकीय ज्ञान मिळण्यासाठी संगणक कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यावेळी डॉक्टर्स, लॅब टेक्निशीन्स, MIDC चे अधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रसंगी सूत्रसंचालन विठ्ठल थोरात – हेड HR क्लीन सायन्स अँड टेकनॉलॉजि यांनी केले…

Previous articleपोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एका ठगास अटक
Next articleमहा विकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नारायणगावात उस्फूर्त प्रतिसाद