महा विकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नारायणगावात उस्फूर्त प्रतिसाद

नारायणगाव (किरण वाजगे)

उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार च्या वतीने आज दि. ११ रोजी पुकारलेल्या बंदला जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मधील सर्व व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.बंद मध्ये सहभागी झाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने नारायणगाव येथील सर्व व्यापारी बांधव, नागरिकांचे आभार मानण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी चे युवा नेते अमितशेठ बेनके, शिवसेनेचे संघटक व माजी उपसरपंच संतोष दांगट, ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रोहिदास केदारी, तालुका सरचिटणीस गणेश वाजगे, मुकेश वाजगे, माऊली रासने, शेखर शेटे, सुदीप कसाबे, जयेश कोकणे, राहुल गावडे, अतुल आहेर, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, अनिल डेरे, सागर दरंदाळे विजय कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अकरा वाजल्यानंतर पुन्हा नारायणगावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले.

Previous articleसीएसटीपीएल फाउंडेशनच्या माध्यमातून दौंडला पहिली आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू
Next articleकळमोडीत डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप