लेकीच्या वाढदिवशी शाळांना ‘व्यासपीठ डायस’ भेट! कु.शिवराज्ञीच्या वाढदिवशी धर्मराज दादांकडून विधायक उपक्रम!

राजगुरूनगर- युवा ग्रामपंचायत सदस्य कु.शिवराज्ञी धर्मराज पवळे हिच्या वाढदिवसानिमित्त तिचे पिता शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष धर्मराज पवळे यांनी अनावश्यक खर्च टाळून चिंचबाईगाव, गोसासी, वाकळवाडी व वाकळवाडीची ठाकरवाडी या शाळांमध्ये भेटवस्तू व खाऊवाटप करुन लेकीचा वाढदिवस साजरा केला.

धर्मराज पवळे यांनी शिवराज्ञीच्या शाळेचा श्रीगणेशा झालेली गोसासी शाळा व स्वत:च्या शिक्षकीपेशाचा आरंभ झालेल्या चिंचबाई शाळेला ‘व्यासपीठ डायस’ भेट दिले. स्वत:च्या गावातील वाकळवाडी व ठाकरवाडी शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत-सन्मान करुन खाऊवाटप केले.वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शाळेच्या पहिल्याच दिवशी या चारही शाळांमधील हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत युवानेते मयूर रणपिसे यांनी व्यक्त केले.

चिंचबाईगावमधील कार्यक्रमासाठी सरपंच पूनम गार्डी, पोलिस पाटील एकनाथ गार्डी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी रणपिसे, सदस्य प्रकाश गार्डी, शिवाजीराव गार्डी, अंगणवाडी कार्यकर्ती मनिषा गार्डी, केंद्रप्रमुख नितीन आडवळे, मुख्याध्यापिका पद्मा सातकर व शिक्षकवृंद ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संदिप ढेरंगे यांनी केले.

गोसासी शाळेतील कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कविता गोरडे, उपाध्यक्ष उमेश राऊत, बाबासाहेब गोरडे, दत्तूआणणा गोरडे, गोरक्ष गोरडे, केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे, मुख्याध्यापिका योगिनी म्हसुडगे व शिक्षकवृंद, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केले तर आभार दत्ता गायकवाड यांनी मानले.

वाकळवाडी व ठाकरवाडी शाळेमध्ये हनुमंत पवळे, बबनराव रेटवडे, नयनकुमार मोरे, रघतवान सर, वाघोले सर, कड मॅडम, मयूर रणपिसे, राजवेद पवळे व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य कु.शिवराज्ञी पवळे यांनी कोरोना काळात उत्कृष्ट आॅनलाईन शैक्षणिक कामकाज केल्याबद्दल शिक्षकांचा सन्मान केला.

Previous articleश्री चे दर्शन घेऊन गणेश भक्त आनंदीत
Next articleगावागावात पेसा हक्क कृती समितीची स्थापना करून लोकशाही मार्गाने न्याय मिळविला जाईल – भरतशेठ फदाले