गावागावात पेसा हक्क कृती समितीची स्थापना करून लोकशाही मार्गाने न्याय मिळविला जाईल – भरतशेठ फदाले

घोडेगाव- सना काठेवाडी

शिनोली (ता.आंबेगाव) येथील फदालेवाडी येथे घटस्थापणे च्या शुभ मुहूर्तावर पेसा हक्क कृती समितीच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ भरतशेठ फदाले यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पेसा हक्क कृती समितीचे अध्यक्ष डी बी बोऱ्हाडे तर प्रमुख पाहुणे पेसा हक्क कृती समितीचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक दत्ता(भाऊ)कोकणे युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतमराव खरात होते.

आंबेगाव तालुक्यात अनुसूची क्षेत्र हे पिंपळगाव(घोडे) या गावापासून आदिवासी भागातील ५६ गावा मध्ये पेसा कायदा लागू झाला असून त्या ५६ गावाच्या ३६ ग्रामपंचायती मध्ये सरपंच,पोलीस पाटील, पासून प्रशासनातील १८ पदे आरक्षित झाल्यामुळे त्या गावातील कायम व पारंपरिक रहिवाशी असलेल्या बिगर आदिवासी समाजावर अन्याय होत असून त्या समाजाचा समावेश पेसा कायद्याच्या तरतुदी व्हावा व हा कायदा जात म्हणून न पाहता त्या भागातील कायमस्वरूपी असणाऱ्या नागरिकांसाठी सरसकट लागू करावा अशी या पेसा हक्क कृती समतीची मागणी असून त्यासाठी त्यांचा लढा चालू आहे. यासाठी या क्षेत्रातील गावा गावा मध्ये पेसा हक्क कृती समितीच्या शाखा उघडून जनजागृती करणे गरजेचे आहे.

यावेळी प्रास्ताविक पेसा हक्क कृती समितीचे खजिनदार पुरुषोत्तम फदाले यांनी केले ,स्वागत गणपतशेठ ढेरंगे यांनी केले तर सूत्र संचालन मा सरपंच मिननाथ आनंदराव यांनी केले

यावेळी अध्यक्ष डी बी बोऱ्हाडे, कार्याध्यक्ष दत्ता(भाऊ) कोकणे, जेष्ठ नेते सिताराम लोहट,विलास बोऱ्हाडे गौतमराव खरात, जेष्ठ सल्लागार आत्माराम बोऱ्हाडे , अमोल अंकुश ,विठ्ठल अप्पा फदाले यांनी मनोगत व्यक्त केली

यावेळी तुकाराम फदाले,सोपान फदाले,अंकुश फदाले,दशरथ फदाले, सुरेंद्र फदाले,रामू बोऱ्हाडे,विठ्ठल बोऱ्हाडे गंगाराम बोऱ्हाडे सकरू बोऱ्हाडे आदी ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते यांनी एक मताने संपूर्ण गावाचा पेसा हक्क कृती समितीच्या पाठिंबा दर्शविला यावेळी गावच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.

Previous articleलेकीच्या वाढदिवशी शाळांना ‘व्यासपीठ डायस’ भेट! कु.शिवराज्ञीच्या वाढदिवशी धर्मराज दादांकडून विधायक उपक्रम!
Next articleवीस महिन्यांनंतर गावात आली एसटी : वाकळवाडीकरांनी एसटी चालक,वाहकाचा केला सत्कार