औझर्डे येथे कोवीडचे लसीकरण

पवनमावळ- परिसरातील औझर्डे गावामध्ये कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये २६० नागरिकांची तपासणी करुन लसीकरण करण्यात आले.ग्रामीण भागामध्ये वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी सुविधा नसल्याने औझर्डे ग्रामपंचायतचे  सरपंच बाळासाहेब पारखी यांच्या पुढाकाराने व प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये लसीकरण लसीकरण करण्यात आले यामध्ये महिला,पुरुष यांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करुन घेतले आहे.

यावेळी माजी सरपंच बाळासाहेब पारखी,माजी उपसरपंच दत्ता ओझरकर,डॉ. नमिता अतकर,डॉ. प्रेसी डेव्हिड, आरोग्य सेविका के.बी. पवार,प्रकाश भालेकर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले आहे.

Previous articleमावळ तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा
Next articleश्री चे दर्शन घेऊन गणेश भक्त आनंदीत