मावळ तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा

पवनानगर- मावळ तालुक्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बैलाची सजावट करुन ढोल ताशांच्या गजरात बैलाची मिरवणूक काढत बैलाचा मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा केला आहे. सद्याच्या युगात मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण आल्याने दिवसोदिवस बैलाची संख्या कमी होताना दिसत आहे परिसरातील ग्रामीण भागात अजुन ही मोठ्या प्रमाणावर बैल पाळली जातात परिसरात शेतीच्या कामासाठी दिवस रात्र शेतकऱ्या सोबत शेतात राबत असल्याने वर्षी तुन एकदा बैलाचा सण साजरा केला जातो.

यावेळी बैलाची पुजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. व सायंकाळी गावातील ग्रामदेवता च्या मंदिराच्या परिसरात वाजत गाजत बैलाची मिरवणूक काढली जाते.बैलपोळा सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल सजावटी मध्ये चांगला दिसावा यासाठी शेतकरी आपल्या परिने त्याचा साजशृंगार बळीराजा खरेदी करतात बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते नंतर गावातील इतर सर्व बैल गावातील ग्रामदेवता च्या प्रगणात पेरा मारला जातो.मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. असा हा पोळ्याचा सण आहे बैलपोळा भाद्रपद अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.

ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात भाताचे पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.परिसरात येळसे, काले,शिवली,करुंज, महागांव,सावंतवाडी,कोथुर्णे,वारु,ब्राम्हणोली,शिवली,शिंळीब,तुंग अशा विविध गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा केला जातो.

Previous articleझेडप्लस, कस्तुरी हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई नेत्र रुगणालय यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Next articleऔझर्डे येथे कोवीडचे लसीकरण