श्री चे दर्शन घेऊन गणेश भक्त आनंदीत

अमोल भोसले, उरुळी कांचन

गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे बंद होती नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ती सर्व धार्मिक स्थळे चालू केली गेली आहेत.

राज्य शासनाने घालून दिलेल्या सूचनेचे पालन करत अष्टविनायकातील पंचम स्थानावर विराजमान असणाऱ्या श्री क्षेत्र थेऊर श्री चिंतामणी गणपती बाप्पा मंदिर भाविकांसाठी पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आला. मंदिर उघडल्यानंतर आगलावे बंधूंच्या, चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने अभिषेक करण्यात आला येणारा गणेशभक्त हा खूप आनंदित होऊन दर्शन घेत होता.

मास्क लावने आणि सामाजिक अंतर पाळून बाप्पांचे दर्शन घेत होते बरेच दिवसांनी मंदिर चालू होणार आहे. व्यवस्थापनाची खबरदारी म्हणून मंदिर परिसरामध्ये दर्शन रांग बांधण्यात आली होती सोशल डिस्टन्स पाळावा म्हणून त्या ठिकाणी चौकोन आखण्यात आले, मंदिरात प्रवेश करतेवेळी सूचनांचा फलक लावण्यात आला मास्क वापर करावा सोशल डिस्टन्स पळावा थर्मल गण तापमान चेक करण्यात आले हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली, पिण्याचे पाणी व स्वच्छता गृह याची व्यवस्था करण्यात आली. गणेश भक्तांचे श्री चे दर्शन घेताना व मंदिर परिसरात येताना खूप आनंदित वातावरण तयार झाली होती

Previous articleऔझर्डे येथे कोवीडचे लसीकरण
Next articleदावडीत गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत बैलपोळा उत्साहात साजरा