कै.तुकाराम धगाटे यांच्या स्मरणार्थ दौंडमध्ये मोफत भगवतगीता क्लास

दिनेश पवार,दौड

कै. तुकाराम लक्ष्मण धगाटे यांच्या स्मरणार्थ दौंड येथे मोफत भगवत गीता क्लास सुरू करण्यात आला आहे, लोणारवाडी (ता.दौंड) येथील वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे महेश धगाटे यांनी हा उपक्रम वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केला आहे,सामाजिक परिवर्तनाचा वसा घेऊन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महेश धगाटे यांनी वडिलांच्या दशक्रिया विधीला देखील वृक्ष लागवड करून पाहुण्यांना वृक्ष वाटप करून एक पर्यावरण संवर्धनाचा कृतिशील उपक्रम राबविला होता या भगवतगीता क्लास मध्ये सहभागीना मराठी मध्ये भगवत गीता,वही,पेन मोफत देण्यात येणार आहे.

या उपक्रमात आनंदी, यशस्वी, समाधानी जीवन कसं जगावं,प्रत्येक संकटात कसे सामोरे जावे, मानसिक ताण, कौटुंबिक समस्या यावर उपाय असे विविध फायदे सहभागीना होणार आहेत, एक नाविन्यपूर्ण उपक्रम दौंड शहरात सूरु करण्यात आला असल्याने याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे महेश धगाटे यांनी सांगितले

Previous articleनवरात्री निमित्ताने डॉ. संजीव करंडे यांच्या तर्फे विविध आरोग्य उपक्रम
Next articleखेडेकर मळा ते बायफ संस्थेचा रेल्वे मोरी खालचा रस्ता चालू करण्याची भाजपची मागणी